साईमत, मालेगाव : प्रतिनिधी
शिलेदार फाउंडेशन यांनी वडगाव येथील गरीब वस्तीत जाऊन तेथील महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने अनोखे रक्षाबंधन साजरे केले. महिलांना साडी भेट देत, तेथील कुटुंबांना फरसाण, गोडधोडचे जेवण दिले. त्या कुटुंबातील महिलांना, त्यांच्या परिवाराला झालेला आनंद हाच शिलेदार फाउंडेशनकरिता प्रेरणादायी ठरला.
रक्षाबंधन म्हणजे रक्षण आणि बंधन यांचा समन्वय होय. आपल्या हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. यात बहीण भावाला हाताच्या मनगटाला राखी बांधते अन् आपले रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते. हाच धागा पकडत समाजातील तळागाळातील वंचित लोकांना मदत व्हावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून ‘शिलेदार फाउंडेशन, मालेगाव जे ‘वसा कतृत्वाचा’ हे ब्रीद घेऊन आपल्या कमाईतून काही भाग काढून ठेवतात अन् आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेतून मदत करतात.
याव्ोळी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी येथील महिलांकडून राखी बांधून घेत त्यांना भेटवस्तू दिल्या. फाउंडेशनचे संस्थापक भास्कर पवार, अध्यक्ष कैलास बच्छाव, प्रसिद्धीप्रमुख भरत पाटील, सचिव अनिल सोळुंके यांनी फाउंडेशनचा हेतू सांगितला.या व्ोळी उपाध्यक्ष योगेश बच्छाव, खजिनदार संदीप गांगुर्डे, सदस्य राजकिरण राजपूत, संदीप जाधव, अमोल ठोके, भाविक पाटील, सुनील खैरे, प्रताप सरावत, विजय रौंदळ, वैभव सोनवणे, स्वप्नील पवार, नीलेश पवार या सर्वच शिलेदारांनी येथील भगिनीकडून राखी बांधत दर वर्षी याच ठिकाणी रक्षाबंधन साजरा करण्याचा निश्चय केला.
