रक्षाबंधनासाठी यंदा खास इव्हिल आय राखी, लुंबा, लाँग डोरी राख्यांचे प्रकारही बाजारात

0
8

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

रक्षाबंधनासाठी यंदा भावाला नजर लागू नये यासाठी खास इव्हिल आय राखी बाजारात दाखल झाली आहे. इतकेच नव्हे तर एडी, फॅन्सी, पेंडल, स्टोन, झरदोजी, लुंबा, लाँग डोरी राखी हे राख्यांचे प्रकारही पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर किड्स, पर्यावरणपूरक सीड राखी व कपल राखी (भय्या-भाभी) अशा अनेक प्रकारच्या राखी असून, सोने- चांदीच्या राखीच्या वेगवेगळ्या डिझाइनचीही क्रेझ वाढली आहे.

यंदा बाजारात 300 पेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. शहरात अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथून येणाऱ्या राख्यांची अधिक विक्री होते. पण, स्थानिक राख्यांनाही मागणी दिसते. एक रुपयापासून ते आठ हजार रुपयांपर्यंत राखी बाजारात आहे. कार्टून राखी 10 ते 130 रुपयांपर्यंत विक्रीला आहेत. देव राखी म्हटली की केशरी, पिवळा, गुलाबी रेशीम, लोकरचा धागा. देवघरातील देवांना या राख्या आवर्जून बांधल्या जातात. आता या राख्यांवर चमकती टिकली, मोती, गोंडा, कुंदन वर्क लावून आकर्षक बनवण्यात आल्या आहेत. तर लहान मुलांत स्पॉयडर मॅन, बॅटमॅन, मोटू-पतलू तसेच लायटिंगच्या राख्यांची क्रेझ असून, 20 रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत त्या विक्री होत आहेत.

सीड राखी, कपल राखीला पसंती

सोन्यात अर्ध्या ग्रॅमपासून तर दीड ग्रॅमपर्यंत राखी उपलब्ध आहेत. सोन्याची राखी 3500 ते 8000 पर्यंत किमतीपर्यंत बाजारपेठेत आहेत. एवढेच नव्हे तर चांदीच्या कार्टून राख्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाच ग्रॅमपासून तर 15 ग्रॅमपर्यंत चांदीच्या राख्या असून, त्या 525 रुपयांपासून तर दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते सांगतात.

राख्यांचे दर वाढले

राख्यांचे दर किरकोळ वाढले आहे. पण, एक रुपयापासूर तर हजार रुपयांपर्यंत राख्या बाजारात आहेत. या वर्षी एडी, लाँग डोरी, लुंबा, ॲक्रॅलिक, भय्या-भाभी, इव्हिल आय राखी नवीन असून, त्यांना अधिक मागणी आहे. यंदा चांगली उलाढाल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here