द्रौ.रा.कन्याशाळेत राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा

0
31

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत मंगळवारी, २९ रोजी राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी होत्या. याप्रसंगी क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे, शिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली. मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात क्रीडा सप्ताह आयोजित केला आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ महत्वाचे आहेत, असे सांगितले.

शासनाच्या पत्रकानुसार संगीत खुर्ची, लिंबू चमचा, कबड्डी, गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा, धावणे शर्यत अश्ाा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्या संघास मेजर ध्यानचंद ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, एस.एस.माळी, डी.एन.पालवे, एस.एस.वाघ, डी.एम.निगोड आदी शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जे.व्ही.बाविस्कर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here