भंडाऱ्यात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती पत्नीला चिरडले

0
14

भंडारा :

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर मोहाडी पोलिसात अपघाताची नोंद करत पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजूला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या डब्लु सी एल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.या धडकेनंतर दुचाकीस्वार पती -पत्नी जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर घडली आहे.

भंडारा-तुमसर राज्यमार्गावरुन भंडाराहून कंपनीमध्ये कोळसा घेऊन हा ट्रक जात होता. यावेळी खरबी येथे महामार्गाच्या बाजूला दुचाकी थांबवून पती-पत्नी त्यांच्या नातेवाईक महिलेसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मयत दुचाकी चालक हे रेल्वेमध्ये कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here