बारासात (पश्चिम बंगाल) ः
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी एका बेकायदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की,कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्यांतर्गत नीलगंजच्या मोशपोल भागात फटाक्यांच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत असताना हा स्फोट झाला.जखमींमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
हा स्फोट इतका भीषण आणि जोरदार होता की, त्याच्या धयाने कारखाना कोसळून त्याचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मेमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येथे एका अवैध फटाका कारखान्यात असाच स्फोट होऊन १२ जण ठार झाले होते.