साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुुकलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याला अटक केली आहे.
सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलगी ही २६ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन महिन्याच्या सुमारास घरी असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याने पीडित मुलीला घरी बोलून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्यानंतर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.
