साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ वर्ष वयोगटातील १२ वी विज्ञानचा विद्यार्थी रितेश किसन चव्हाण याने नाशिक येथे १९ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय ग्रेपलिंग असोसिएशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले आहे.
याबद्दल रितेशचा शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. गिरीष महाजन, सचिव साधना महाजन, संस्थेचे संचालक ॲड.शिवाजी सोनार, संचालक मंडळ, प्राचार्य आर.जे.सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रितेशचे कौतुक केले आहे.
