साईमत, जामनेर : प्रतिनिधी
भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधनानिमित्त जामनेर येथील वंदन मातृभूमी प्रतिष्ठाच्यावतीने राखी पाठविण्यात आली. काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओरिसा राज्यातील २ हजारांपेक्षा जास्त जवानांना राखी पाठविण्यात आली आहे.
जामनेर शहरातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने आवाहन केले होते.”एक राखी भारतीय सैनिकांसाठी” या आवाहनाला साथ देत हजारो विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी रक्षा पाठविण्याची व्यवस्था केली. यासाठी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण, शांताराम काळे, अंकुश जोशी, शेख सईद, शेख इम्रान, मयूर चौधरी, निलेश देवरे, संजय सपकाळ, हर्षल सूर्यवंशी, योगेश गोसावी आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
