साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारात एका शेतात कैट जातीचे हरीण मृतावस्थेत आढळून आले आहे. ही घटना संबंधित शेतमालकाला सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त शेतात गेल्यावर नजरेस पडली. त्यांनी लागलीच ही घटना वनविभागाला कळविली. हरणाला सर्पदंश किंवा विंचू (नैसर्गिक) चावल्याने मयत झाले असावे? असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. दरम्यान, पारोळा वनविभागाने घटनास्थळी जावून मृत हरीणची विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात घेतले. हरणाचा मृत्यू हा सर्पदंशने झाला असावा? असा अंदाज व्यक्त होत आहे.
