जळगाव जामोद ः प्रतिनिधी
तालुक्यातील पडशी सुपो येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उदयन विद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रावे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत गावातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम यशस्वी केला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील आपल्या दिलेल्या अंंधश्रद्धा,रूढी परंपरेच्या नुकसानाबाबत समजावून त्यांंना त्यांच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राजक्ता बोंबटकार व सचिव प्रमिला बोंबटकर या होत्या.यावेळी महिला मंडळाच्या इतर सदस्या व गावकरी तसेच उद्यान विद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनुराग नारखेडे,आदित्य पाटील,सुरज मुंडे, सुचित मसाज,कृष्णा सूर्यवंशी,रोहित महाले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतीश धर्माळ,कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रितेश वानखेडे व विषय तज्ञ प्रा.जीवेश साडी यांचे मार्गदर्शन लाभले.