साईमत, जळगाव : प्रतिनिधी
ममुराबाद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिस पटेल यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आरती सचिन पाटील यांची उपसरपंचपदी शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात एकमताने निवड करण्यात आली. ही निवड सरपंच हेमंत पाटील, ग्रामविकास अधिकारी कैलास देसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, अनिस पटेल, गोपाळ मोरे, विलास सोनवणे, शैलेश पाटील, संतोष कोळी, एजाज पटेल, अंजना शिंदे, खातूनबी शेख रसीद, सुनीता चौधरी, रंजना ढाके, लता तिवारी, पोलीस पाटील आशा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील दत्तात्रय पाटील, विलास शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, जितेंद्र पाटील, विलास पाटील, आत्माराम पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.
