Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच
    नाशिक

    नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

    SaimatBy SaimatAugust 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नाशिक : प्रतिनिधी
    एकीकडे नाशिक पोलीस सायबर दूतांच्या नेमणुकीसह शहरभर चौक बैठका आयोजित करत आहे. मात्र दुसरीकडे खुनाचे सत्र सुरूच असून अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस चौकीच्या काही अंतरावरच भाजीविक्रेत्याला संपविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
    काही दिवसांपूर्वी शहरातील अंबड भागात एका सराईत गुन्हेगाराला टोळीवादातून संपविण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरात भरदिवसा नागरिकांच्या गर्दीत एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. तर पोलिसही वारंवार घडणाऱ्या घटनांनी चक्रावले असून एक गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने पोलीसांचा धाक संपला की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरात पंधरा दिवसांत खुनाची चौथी घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या तरुणावर सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चार ते सहा हल्लेखोरांनी भाजी विक्रेता संदीप याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या खुनी हल्ल्याचा थरार येथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. दरम्यान आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून हल्लेखोर फरार झाले. अंबड पोलीस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची दोन पथके तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी काही तासातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

    अवघ्या तीन तासात पोलिसांनी या खूनाचा उलगडा करुन पाच आरोपींना ताब्यात घेतले असून तीन आरोपी अद्याप फरार आहे. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मोऱ्या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे कायदा- सुव्यवस्था उरली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik Cyber Crime : नाशिकमध्ये सायबर गुन्हा: मॉर्फ फोटो आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार

    December 8, 2025

    MAHA TET 2025 गोंधळ: इंग्रजी माध्यमाला मिळाले मराठी प्रश्नपत्रिका!

    November 28, 2025

    Malegaon Crime : चिमुकलीच्या हत्येनंतर मालेगाव पेटला; संतप्त जमावाचा कोर्टाच्या गेटवर ताबा

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.