मलकापुरला ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

0
102

मलकापूर : प्रतिनिधी

मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, डीपी पथकाचे प्रमुख स.पो.नी. करुणाशील तायडे, स.पो.नी. लेडीज सिंघम स्मिता महसाये, पो.नि. सुरेश रोकडे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आनंद माने, ईश्वर वाघ, पंजाबराव शेळके, गोपाल तारूडकर, गोपाल इंगळे, मंगेश चारखे, प्रवीण गवई, राहुल वाघ, मुळे, एल.पी.सी. प्रियांका डहाके, निता वाढे यांनी विविध दाखल गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महानिरीक्षकांनी सन्मानित केले.

यावेळी बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पाचही विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here