साईमत, धुळे: प्रतिनिधी
येथील गांधी चौकामधून 14 फुटी सात त्रिशूळांची शोभायात्रा काढून श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी गांगेश्वर व शहरातील प्राचीन महादेव मंदिरात त्रिशूळ बसविण्यात आले. या व्ोळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
शहरातून ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम’, ‘हरहर महादेव’च्या घोषणा देत रविवारी 14 फुटी सात त्रिशूळांची शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी शहरातील प्राचीन काळातील महादेव मंदिरात त्रिशूळ बसविण्यात आले. यात श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर, श्री कडेश्वर महादेव मंदिर, श्री दमडकेश्वर महादेव मंदिर, श्री लोणेश्वर महादेव मंदिर, श्री गांगेश्वर महादेव मंदिर, श्री भातोजी महाराज मंदिर, श्री वटकेश्वर महादेव मंदिर आदी मंदिरांचा समाव्ोश होता.शोभायात्रेव्ोळी भाविकांनी मोठी गर्दी होती.
गांधी चौकात शहरातील योगेश्वर महाराज देशपांडे, स्वामी शिवानंद महाराज (धुनीवाले बाबा), मकरंद वैद्य, दयाराम महाराज माळी, किरण महाराज महाजन, विजय महाराज काळे, ईश्वर महाराज लाडे, इंजि. मोहन सूर्यवंशी या महाराजांच्या हस्ते पूजन करून सहा ट्रॅक्टरांवरून त्रिशूळांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. महिलांनी जागोजागी त्रिशूळाची आरती केली व सायंकाळी ज्या मंदिरात त्रिशूळांची स्थापना होणार आहे त्या मंदिरस्थळी त्रिशूळ पोचविण्यात आले. श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी शहरातील प्राचीन काळातील महादेव मंदिरात त्रिशूळ बसविण्यात आले. पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या सहकार्याने या त्रिशूळांची स्थापना करण्यात आली.