आमदार अपात्रता प्रकरणी नियमानुसार लवकरच कारवाई : राहुल नॉर्वेकर

0
19

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्याव्ोळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्याव्ोळी ते ‌‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी‌’ म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर व नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिस बजावली. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. या संदर्भात पत्रकारांनी नार्व्ोकरांना नोटिसची व्ोळ संपली असून कारवाई कधी होणार ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी मुंबईत बोलत होते.

कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही
आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावले जाईल यावर राहुल नार्व्ोकरांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहे. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमाचे पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here