पाचोरा ः प्रतिनिधी
तालुक्यातील डोगरगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पंढरीनाथ मागो पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने डोगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
डोगरगावातील जनसामान्यांचा देव माणूस , एक सच्चा समाजसेवक आपल्यातून हरवला असल्याची भावना ग्रामस्थामधून उमटत आहे. गावांतील सरपंच म्हणून आपल्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. शनिवारी दु ३.३० वा. त्यांचे निधन झाले.
गावात कोणीही आजारी पडले किंवा डीलव्हेर ऑपरेशन वैद्यकीय उपचार करायचे असले तर स्वता हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ चर्चा करून सहकार्य करत होते. काही रुग्णांना स्वतः घरून जेवणाचा डब्बा पुरविणे, आर्थिक मदत करणे हे माणुकीचे काम करायचे तसेच लग्न कार्यात देखील आर्थिक सहकार्य करायचे शेवटी समाजात समाजसेवक करण्याचे काम त्यांनी कोरोना संसर्ग महामारी सुद्धा रुग्णालयात दाखल होईस्तोवर, अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही अतिशय प्रामाणिक जनसेवक म्हणून राहिल गावात अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. पंढरीनाथ पाटील हे डोगरगाव ग्रामपंचायतचें माजी सरपंच व सदस्य आहे तसेंच जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे सदस्य होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नात असा मोठा परिवार आहे ते साईमतचे पत्रकार गणेश शिंदे यांचे पाहुणे होत.