साईमत, नाशिक ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापारी यांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केले. वणी येथे रास्तारोको करण्यात आला. निफाड प्रांताधिकाऱ्यांकडे ठाकरे गटातर्फे शुल्क हटविण्याची मागणी करण्यात आली. तर, िंपपळगाव बसवंत येथे आमदार दिलीप बनकर यांनी निर्णयाचा निषेध करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वणी येथील वीर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना आणि सर्व पक्षांच्या वतीने तासभर आंदोलन करुन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना निव्ोदन देण्यात आले. आंदोलनामुळे तासभर वाहतूक थांबली होती. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या. िंदडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेचाही निषेध करण्यात आला. वणी येथील आंदोलनात िंदडोरी, कळवण, देवळा, सुरगाणा तालुक्यातील कांदा उत्पादक, बाजार समितीचे अध्यक्ष, संचालक, व्यापारी सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप, िंदडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, गणपतबाबा पाटील, विलास कड, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते.