साईमत, प्रतिनिधी, जळगाव
जळगाव-शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळ पायी जात असलेल्या वृद्धाला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्यान वृद्ध जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोदर मूलचंद बंजारा (वय ६६) रा. महाबळ रोड, महाबळ पोलीस चौकी, हे शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानाजवळून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर येणारा महिपाल धर्मपाल जांगिड (रा. रविराज कॉलनी), याने मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृद्धांने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दुचाकीधारक महिपाल धर्मपाल जांगिड यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.
