निंबायती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता पाटील बिनविरोध

0
17

सोयगाव : प्रतिनिधी

निंबायती ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंचपदी सुनीता राजू पाटील यांची सोमवारी, २१ रोजी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी केली. त्यामुळे निंबायतीच्या सरपंचपदी सुनीता पाटील ह्या नवनियुक्त सरपंच ठरल्या आहेत. सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभागृहात होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.

निंबायती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवारी अध्यासी अधिकारी विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच पदासाठी सुनीता पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे सुनीता पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी यांनी केली. सूचक म्हणून सदस्य विशाल गोसावी यांनी नाव सुचविले होते. यावेळी सभागृहात विशाल गिरी, सलमान तडवी, तबस्सुम तडवी, नर्मदा राठोड, उज्ज्वला राठोड, कल्पना जाधव, सुनील राठोड, नूरजहा तडवी, अर्चना राठोड, वैशाली चव्हाण, बद्री राठोड, नारायण राठोड अशा तेरा सदस्यांची उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष

यावेळी ज्येष्ठ नेते धनजी राठोड, राहुल गोसावी, दीपक चौधरी, यशवंत जाधव, पारस राठोड, भरत राठोड यांच्या नेतृत्वाखाली सांडू राठोड, प्रेमसिंग राठोड, पोपट राठोड, अमृत राठोड, जगन चव्हाण, पूनमचंद चव्हाण, मखराम राठोड, भगवान चव्हाण, प्रताप राठोड, अनिस तडवी, अमर गोसावी, अलीबाबा तडवी, जाबीर तडवी, जुबेर तडवी, अनुप तडवी आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी मंडळाधिकारी मारोती धोंडकर, तलाठी शिला मोरे, ग्रामविकास अधिकारी सुनील रोकडे, पोलीस पाटील बालीबाई चव्हाण, मूलचंद राठोड आदींनी कामकाज पाहिले. सोयगाव पोलीस ठाण्याचे अजय कोळी, सादिक तडवी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here