आ. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त १ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

0
18

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या अभियाना अंतर्गत येत्या १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी उपस्थित राहतील.

शिबिरात मुक्ताईनगर तालुक्यातील व पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी, एनएसएस स्वयंसेवक आणि नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ हे ब्रीदवाक्य ऊराशी बाळगून आपण प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने कुटुंबात, समाजात व गावागावात पोहोचवावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावयाचा असेल त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी केले आहे.

शिबिराला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ .प्रतिभा ढाके व ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबिराचे संयोजन रेड प्लस सोसायटी, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहिरा मिर, प्रा. डॉ. दीपक बावस्कर, प्रा. विजय डांगे (८४२१७०९८९९) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here