Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»पं.स. बीडीओंचा हलगर्जीपणा अन्‌‍ प्रशासनाची दिरंगाईने गाठला कळस
    यावल

    पं.स. बीडीओंचा हलगर्जीपणा अन्‌‍ प्रशासनाची दिरंगाईने गाठला कळस

    Milind KolheBy Milind KolheAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेखर पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या आमरण उपोषणाचा रविवारी सातवा दिवस होता. उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून उपोषणकर्त्यांनी औषधोपचार घेण्यास मात्र नकार दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दिरंगाईने कळस गाठला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या जिवावर बेतले आहे.

    सविस्तर असे की, तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतमधील २०२० ते २०२२ या कालावधीत दरम्यान प्राप्त पंधराव्या वित्त आयोग निधीमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांकडून झालेल्या अपहार संदर्भात तसेच ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. रावेर, यावल आ.शिरीष चौधरी, उपोषणकर्ते माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी त्यावर काहीही कारवाई केलेली नसल्याने आपलेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा १९८१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा चार दिवसाचे आत सादर करावा. तसेच प्राप्त अहवालानुसार अपहार व अनियमित्ता असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून जबाबदार व्यक्तीवर करावयाच्या कार्यवाहीचा, प्रस्तावा सोबत उपस्थित रहावे. आवश्यकता असल्यास तात्काळ राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडील ४ जानेवारी २०१७चे पत्रान्वय कारवाई करावी, असे पत्र प्राप्त झाल्यावरही उपोषणकर्त्यांकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे.

    उपोषणाला अनेकांचा पाठिंबा

    उपोषणाव्या सातव्या दिवशी माजी आमदार रमेश चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा)चे संतोष खर्चे, शरद कोळी, पप्पु जोशी, अजहर खाटीक, सारंग बेहडे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद जावेद अली, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, रा.काँ.चे विजय पाटील, युवक राष्ट्रवादी पवन पाटील, राजेश करांडे यांचा पाठिंबा मिळाला आहे. मालोद येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे प.पू. प्रभुजी स्वामी महाराज यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देवून उपोषणकर्त्यांची आस्थेने प्रकृतीची विचारणा केली. तसेच यावल तालुक्यातून विविध स्तरावरून पाटील यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे.

    उपोषणकर्त्यांचा औषधोपचार घेण्यास नकार

    पंचायत समितीच्या प्रशासनाकडून उपोषणकर्ते शेखर पाटील आणि त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी, सलीम मुसा तडवी यांच्या उपोषणाची अद्याप प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रशासनाचे लाजिरवाणी प्रकार समोर आले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवसी उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालवली असल्याची माहिती डॉ.प्रशांत जावळे यांच्याकडून मिळाली. असे असतांनाही उपोषणकर्त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.