आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द

0
15

लातूर :

विविध जिल्ह्यांतील ग्राम पंचायती आता गावकऱ्यांच्या प्रश्नावर जागृक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामसभेमध्ये किरकोळ कारणावरुन वाद घालण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जात आहे. असाच एक निर्णय लातूरच्या यरोळ ग्रामपंचायतीने घेतला होता.

आई-वडिलांचा काळजी न घेणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना यामुळे मोठी चपराक बसली आहे. अशा मुलांविरुद्ध कारवाईचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याआआधी कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता. आता यरोळ ग्रामपंचायतीने हा स्तुत्य असा निर्णय घेतला आहे.

अलिकडच्या काळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणारे मुलं-मुली अनेकदा तुम्ही पाहीली असतील. अशा मुला-मुलीला चाप बसवणारा आदेश लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं काढला आहे. आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.

हा निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सर्व गावकऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केला. आता या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनीही स्वागत केला आहे. असा निर्णय घेणारी लातूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here