जळगावचे दोघे धावले १०० वी हाफ मॅरेथॉन

0
16

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

येथील दोघांनी असामान्य अशी १०० वी हाफ मॅरेथॉन (२१कि.मी.रनिंग ) पूर्ण केली. जळगाव शहरातून प्रथमच असा विक्रम करणारे भारत पेहवानी (४७वय) आणि होरीलसिंग राजपूत (५३वय) अशी त्यांची नाव आहेत. भारत पहवानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे तर होरिलसिंग राजपूत यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे

सकाळी मेहरूण तलाव ट्रॅकवर ठिकठिकाणी रांगोळी, ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव करून त्यांच्या विक्रमाला शहरवासीयांनी दाद दिली. त्यांच्या १००व्या हाफ मॅरेथॉनचा फिनिश लाईनला सोबत होते १०० जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू व १०० ओम योग ग्रुपचे सदस्य, तसेच पिंकेथॉन ग्रुपच्या महिलांचा सहभाग लक्षणिय होता.

हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्या दोघांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, डॉ. शेखर रायसोनी, ओम योगा ग्रुपचे डॉ.अभय गुजराथी, जे.आर.जी.चे अध्यक्ष किरण बच्छाव, योगशिक्षक सुनील गुरव, सायलिस्टसचे प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

‘हे सर्व जे.आर.जी मुळे शक्य
जळगाव रनर्स ग्रुप रनिंग विषयात जळगावात जी जागृतकता निर्माण केली. त्यामुळेच आम्ही १०० वी हाफ मॅरेथॉन पूर्ण करू शकलो व योगाच्या सरावामुळे श्वासावर नियंत्रण ठेवणे शक्य होते, असे बोलताना भारत पहवानी अत्यंत भावनिक झाले होते. सर्व जळगाव शहरवासीयांसाठी ही अत्यंत अभिमानस्पद बाब आहे. याचे संपूर्ण श्रेय जळगाव रनर्स ग्रुपला जाते. शहरात रनिंग ट्रॅक बनविण्यासाठी सर्व मदत करेल, असे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.”

‘विविध संस्थांतर्फे सत्कार’
जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थातर्फे,अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, सेन्ट्रल फुले मार्केट असोसिएशन, हरी ओम वॉकिंग ग्रुप, राजपूत समाजतर्फे यावेळी दोघांचे सत्कार सुद्धा करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here