फैजपूर ता.यावल ः प्रतिनिधी
सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघाने सामाजिक जाणिवेतून न्हावी (ता. यावल) ग्रामीण रुग्णालयाला तीस हजार रुपये किमतीचे प्लस ऑक्सिमीटर, पॅरामॉनिटर भेट दिले. ग्रामीण रुग्णालयाला पॅरामॉनिटरची आवश्यकता होती.
गरज ओळखून शिक्षक संघाने रुग्णालयाला पल्स ऑक्सिमिटर भेट देण्याचा निर्णय घेतला. रुग्णांचे इसीजी, एच. आर, एस.पी.ओ २, एन.आय.बी.पी., तापमान अशा विविध बाबींचे मापन ही मशीन करते. रूग्णांचे प्राथमिक निदान करण्यासाठी ही मशीन अतिशय उपयोगी ठरणार आहे. रुग्णालयाला कोणतेही मदत लागल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन महासंघाने दिले. सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रसन्न बोरोले, सचिव विक्रांत चौधरी व सदस्य सुरेश इंगळे, विजय कोल्हे, हरीश बोंडे, जितेंद्र फिरके, कुंदन वायकोळे, योगेश इंगळे, ललीत महाजन ,जीवन महाजन अमित चौधरी, डॉ कौस्तुभ तळेले, डॉ अभिजीत सरोदे, डॉ प्रसाद पाटिल, रिता धांडे, मोहिनी भारंबे, संतोष चौधरी, संदीप महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे यांची उपस्थिती होती.