साईमत, पुणे : प्रतिनिधी
सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलतात, तरीही त्यांची वक्तव्ये माध्यमे वारंवार का दाखवतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. िंपपरी येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात ते बोलत होते. याव्ोळी त्यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, ती कायम जिवंत ठेवा, असे आवाहन करत माध्यमांवर खोचक टीकाही केली व काही सूचनाही केल्या.
राज म्हणाले, सध्याची पत्रकारिता म्हणजे, हा नेता काय म्हटला आणि त्यावर तो नेता काय बोलला? एवढेच सुरू आहे. अशा राजकारण्याला एकट्याला बोंबलू द्या ना शौचालयात. तिथे जे बाहेर पडायचं ते माध्यमे समोर आले की त्याच्या तोंडातून बाहेर पडते आणि माध्यमेही वारंवार त्याच्यासमोर आपला बूम घेऊन जातात. तेच लोक बघतात. याला काय पत्रकारिता म्हणायचे?
मोबाईलमुळे निरुद्योगी वाढले
पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, तुम्ही म्हणता लिहिल्यावर तुम्हाला ट्रोल केले जाते. मग वाचता कशाला? मुलाखत झाली, भाषण झाले, एकदा शब्द गेले ना. मग कुणाला काय वाटेल ते वाटेल. कुणाला आवडेल, कुणाला नाही. हे कशाला वाचत बसता. त्यावर चार शिव्या पडतात. मग आमचा हिरमसून बसतो. कशाला वाचता? मोबाईल नावाचे खेळणे आल्यापासून अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले. ट्रोल करणाऱ्याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. राजकीय लोकांनी पाळलेली ही लोक आहेत. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता? जे महाराष्ट्र हिताचे असेल, मराठी माणसाच्या हिताचे असेल त्यावर निर्भिडपणे बोलणे आणि लिहिण्याची गरज आहे.
ब्रेिंकग न्यूजचा दर्जाच घालवला
राज ठाकरे म्हणाले, माझ्या घरासमोर नेहमी पत्रकारांचा घोळका असतो. एखादा कार्यक्रम असला आणि मी घराबाहेर पडलो की लगेच ब्रेिंकग न्यूज दाखवतात. राज ठाकरे घराबाहेर निघाले. अरे, ही काय ब्रेिंकग न्यूज झाली तुमची. घरात असलो आणि माझे बोट दिसले तरी ब्रेिंकग न्यूज राज ठाकरेंचे बोट दिसले, हात दिसला. आता आणखी माझे काय-काय पाहायचे आहे तुम्हाला? पूर्वी दूरदर्शनवर ब्रेिंकग न्यूज दिसली की आम्हाला धडकी भरायची, आता काय दाखवणार आहे म्हणून. मात्र, आता याचे बोट आणि त्याचे बोट, असा खेळ चालू आहे. ब्रेिंकग न्यूजचा दर्जाच घालवला.