Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»उस्मानिया पार्क येथे दीड वर्षाच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके
    जळगाव

    उस्मानिया पार्क येथे दीड वर्षाच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

    saimat teamBy saimat teamMay 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    शहरातील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच बालकाला वाचविले. जखमी बालकाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
    अधिक माहिती अशी की, शहरातील उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते पेंटर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान राहत्या घराच्या अंगणात आज गुरूवारी सकाळी १० वाजता एकटाच खेळत होता. अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकटा खेळत असलेल्या बालकांवर हल्ला केला.
    कुत्र्याने बालकाच्या मानेवर मोठ्याने चावा घेतला. यात बालक गंभीर जखमी झाला. बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याचे पाहून आई नाजमी यांनी आरडाओरड केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीने सोडविले. तातडीने खाजगी वाहनाने जखमी बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.