मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरातील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल येथे ७७ वा स्वातंत्र्य दिवस चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेखर पाटील, तुषार वाघुळदे, शरद भालेराव, शाळेचे संस्थापक अध्यक्ष मासुळे, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे, पंकज कपले यांच्यासह सर्व पालक, शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शेखर पाटील, तुषार वाघुळदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा काटे यांनी केले.