Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»महागाई, बेरोजगारीपेक्षा मी कोणत्या गटात जाणार याला महत्त्व : जयंत पाटील
    राजकीय

    महागाई, बेरोजगारीपेक्षा मी कोणत्या गटात जाणार याला महत्त्व : जयंत पाटील

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने पक्षातील अनेक निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी अजित पवारांची साथ केली आहे. तर, शरद पवारांकडे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सहकारी थांबले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. यावरून जयंत पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
    विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा सुनिल तटकरेंसोबतचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर, जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती. त्याच काळात जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, मी शरद पवारांसोबतच कायम राहणार असून शेवटपर्यंत राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही, अशी ठाम भूमिका जयंत पाटलांनी घेतली. आजही ते बीड येथे शरद पवारांसोबत दौऱ्यानिमित्त आले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.
    त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “रोज सकाळी उठून बोलणं मला योग्य वाटत नाही. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील बेरोजगारी, महागाई, मणिपूरचा हिंसाचार या दुर्दैवी घटना घडत आहेत, पण याला महत्त्व नाही. परंतु, जयंत पाटील कुठे जाणार, याला महत्त्व आहे. हे सगळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारण्याचा प्रयत्न कोणी करतंय याचा शोध घ्यावा. मी आहे तिथेचआहे.
    शरद पवार सर्वांनाच भेटतात
    शरद पवार अनुभवसंपन्न आहेत. सर्वांना भेटणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. कोणी भेटून गेला म्हणून पवारसाहेब त्यांच्या मागे जात नाही. महाराष्ट्रातील सर्वांना त्याचा अनुभव आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.साहेबांचा आशीर्वाद कोणी मागत असेल त्याच्या आड येण्याची गरज वाटत नाही. साहेबांचा आशीर्वाद मागण्याची गरज आहे, यातच आपण ओळखलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.