साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमध्ये नवीन शिक्षक भरतीत प्रचंड ‘महाघोटाळा’ झाला आहे. त्यासाठी सचिवांनी औरंगाबाद येथे ८० लाख रुपये दिल्याचे समजते. कोणाला दिले? का दिले? सचिव संचालक मंडळांना सांगतील का? का परस्पर काला मोडत अशीही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलचे सचिव संचालकांना कधी विश्वासात घेत नाही. काही संचालक तर असे आहे त्यांना बोलण्याची पद्धत नाही. यासोबतच राहण्याची पद्धत नाही. पण बोलायला आमच्यासारखे हुशार कोणीच नाही, असे दर्शवितात. त्यांना बघून शाळेतील शिक्षक, शिक्षिका खुर्चीवरून उठत नाही. त्यांची किंमत शाळेत शून्यासारखी असल्याची काही स्थिती शाळेत आहे.
काळा पैसा जनतेसमोर आलाच पाहिजे
तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलचे संचालक एकात एक नाही. त्यांचे एकमेकांबद्दल अनेक मतभेद आहेत. शिक्षकांचा पगार बँकेच्या खात्यावर येतो. तो कुठून येतो, हे शिक्षकांना माहित नसते. मात्र, सचिवांच्या खात्यावर पैसे मागवितात. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खात्यावरून ती रक्कम काढण्यात येते, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक भरती घोटाळा आणि काळा पैसा जनतेसमोर आलाच पाहिजे, अशी मागणी काही पालकांमधून होत आहे.