साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयलच्या माध्यमातून अन्नपूर्णा रेसिडेन्सी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे अध्यक्ष हर्षद ढाके तसेच किसनराव जोर्वेकर, योगगुरु मधुकर कासार, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.जाधव यांनी सैनिकांप्रतीचे ऋणनिर्देश व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माजी सैनिक आबासाहेब गरुड यांनी सैनिकांच्या जीवनातील कथा आणि व्यथा समर्पक शब्दात मांडली.
यावेळी सेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांपैकी आबासाहेब गरुड, वाल्मीक रामराव निकम, विकास देवरे, दिलीप पाटील, गोविंदा वाघ, बापूसाहेब चौधरी, नितीन परदेशी, सैनिक मित्र समाधान राठोड, आरोग्यदूत विनोद राणा, कार्यरत सैनिकांपैकी प्रभाकर दाभाडे, माजी सैनिक अल्ताफ मुसा पटवे, विजय निकम, गुलाब देवरे, संदीप चव्हाण, रामदास कचरू पवार, रामदास पितांबर पाटील आदी माजी सैनिकांना सन्मानपत्र व भारताचा राष्ट्रध्वज देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार मुराद पटेल, स्वप्नील वडनेरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी रवींद्र शिरोडे, उमाकांत ठाकूर, हरित जैन, योगेश पाटील, भरत दायमा, नरेश दोषी, डॉ. श्रीरंग देशमुख, ऋषभ सुराणा, जयवीर पाटील, आबासाहेब पाटील, मनोज चौधरी, डॉ.स्वप्नील शिंदे, किरण बाविस्कर, चेतन राजपूत, रोशन ताथेड, संग्राम शिंदे, कविता शिंदे, श्रीमती कासार यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन डॉ. संदीप देशमुख तर आभार रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयलच्या सचिव डॉ. विरजा देशमुख यांनी मानले.