Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पिंप्राळा परिसरात अग्निशमन दलाचे नवीन केंद्र उभारले जाणार – महापौर महाजन
    जळगाव

    पिंप्राळा परिसरात अग्निशमन दलाचे नवीन केंद्र उभारले जाणार – महापौर महाजन

    saimat teamBy saimat teamMay 5, 2021Updated:May 5, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनीधी

    शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता उपनगरांंमध्ये अग्निशमन केंद्राची मागणी वाढत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पिंप्राळा परिसरात अग्निशमन दलाचे नवीन केंद्र लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी केले.

    जागतिक अग्निशमन सैनिक दिन मंगळवारी गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलात साजरा करण्यात आला. महापौर यांनी केंद्रप्रमुख शशिकांत बारी यांच्यासह विश्‍वजित गर्डे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर महाजन यांनी कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचवणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्यामुळे त्यांचे कार्य हे गौरवास्पद आहे, असे सांगितले.

    महापालिकेच्या अग्निशमन केंद्राकडे जुन्या ३ व नव्या ४ अशा एकूण ७ फायर फायटर गाड्या उपलब्ध आहेत. त्यापैकी एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी महापौरांकडे केली.

    महापौर महाजन यांनी कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचवणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्यामुळे त्यांचे कार्य हे गौरवास्पद आहे, असे सांगितले.

    शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी करण्याच्या अनुषंगाने पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल. उपकरण खरेदीचा विषय या महिनाअखेर सोडवण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाखांपर्यंत तरतूद केलेली आहे. खासदार उन्मेष पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी अधिकार्‍यांसोबत डिसेंबर २०२०मध्ये बैठक झाली होती. त्यात एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे केंद्र एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होऊन ते त्यांच्याकडे कार्यान्वित झाले आहे. मनपाच्या केंद्रासाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे, हा प्रश्‍नही लवकर निकाली काढला जाईल असे आश्‍वासन दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.