साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील एसएसएमएम महाविद्यालयात विद्यार्थी विकास व एनएसएस विभागाच्यावतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत १०० वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. दरवर्षी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून पर्यावरण संवर्धनाची जागृती करण्यात येते. वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, संचालक राका देवरे, डॉ.जयंत पाटील, डॉ.पितांबर पाटील, योगेश पाटील, भोलाआप्पा चौधरी, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.जी.बी.पाटील, प्रा.राजेश मांडोळे, प्रा.एस. एस. पाटील, डॉ.एस.बी.तडवी प्रा.पी.एम.डोंगरे, डॉ.माणिक पाटील, प्रा.राजेश वळवी, प्रा.महेंद्र महाजन, प्रा.वाय.बी.पुरी, डॉ.शरद पाटील, प्रा.स्वप्नील भोसले, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर, मच्छिंद्र जाधव, रवी कदम, रवि चौधरी, समाधान पवार, राजू पाटील, सुनील नवगिरे, एन.टी.पाटील, भिला पवार आदी उपस्थित होते.