साईमत सावदा प्रतिनिधी
सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, श्री.आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात स्व.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरीब व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी दादासाहेब वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे , उपनगराध्यक्क्षा नंदाबाई लोखंडे, शिक्षक पालक संघाचे सदस्य शामकांत पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्पना ठोसरे , श्रीकांत वाणी, बी.जी. भालेराव, जे.व्ही. तायडे आदिंची उपस्थिती होती.
श्री.आ. गं. हायस्कूलच्या इयत्ता सहावी तुषार कोळी, योगेश चौधरी, तन्मय अजहर शहा फकीर, इयत्ता सातवी कार्तिक साळी, आदित्य सरोदे, फाल्गुन चौधरी, इयत्ता आठवी चेतन महाजन ,मधुर तायडे, हर्षित नेमाडे, युनिक वाणी, इयत्ता नववी साहिल तडवी, प्रथमेश पाटील, ईशांत कोळी इयत्ता दहावी भूषण कायदे ,भावेश पाटील ,यशवंत भारंबे, इयत्ता अकरावी सागर पाटील , दिव्या सरोदे, तनुजा चौधरी , इयत्ता अकरावी कला गायत्री लोखंडे, रिया लोखंडे, इयत्ता बारावी सायन्स वैष्णवी सैतवाल, इयत्ता बारावी कला मुबारिका बोहरी या विद्यार्थ्यांना व श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिराच्या सहावी इयत्ता पाचवी, हेरल नितीन चौधरी, इयत्ता सातवी कल्पना बेंडाळे ,पूर्वा चौधरी, तमन्ना तडवी, देवयानी सपकाळे, देवयानी बेंडळे, इयत्ता आठवी डिंपल पाटील, ममता टोके ,अंतरा कठोरे, स्वप्नाली वाणी, अनुष्का सोनवणे, इयत्ता नववी श्रावणी नेमाडे ,रोशनी चौधरी, भाग्यश्री पुरभी, प्रेरणा सोनवणे, पूजा कुंभार विद्यार्थिनींना शालेय उपयोगी साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सीसी सपकाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाळेसाठी नानासाहेब हे दानशूर व्यक्तिमत्व होते त्यांच्या जयंतीनिमित्त होत असलेला हा कार्यक्रम गरीब विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे, त्यांच्या शैक्षणिक वस्तू होत असलेल्या तून व त्यांच्या केलेल्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी व आयुष्यात यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नानासाहेबांच्या कार्याचा अल्प परिचय एनसीसी शिक्षक संजय महाजन यांनी विद्यार्थ्यांना करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक नंदू पाटील यांनी केले.