साईमत मलकापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्पोर्ट्स क्लब ठाणे येथे दिनांक १५ ते १९ ऑगस्टला ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी नुकतीच केली.
या वर्षी झालेल्या दोन जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ ठाणे मुंबई येथील राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी शेगाव येथील रुद्र कचरे व मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी जळगाव जामोद येथील रेवा पाचपोर यांची नियुक्ती संघटनेचे उपाध्यक्ष खिझर खान यांनी नुकतीच केली.
मुलींचा संघ – रेवा पाचपोर(कर्णधार ), शरयू रेवस्कार, मानसी सुरळकर, राधिका उबरहांडे, सावी गोलाईत, आरुषी कळूसे. मुलांचा संघ – रुद्र कचरे (कर्णधार), अर्णव निंबाळकर, वरद हिंगे, वेदांत उमरकर, सुमित परिहार, अथर्व लांजुळकर. प्रशिक्षक राहुल जगदाळे.
सदर जिल्हा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.११ ते १४ ऑगस्ट पर्यंत राहणार असून जिल्हा संघ ठाणे येथील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता दि.१४ ऑगस्टला रवाना होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बॅडमिंटन स्पोर्ट्स असो.चे बुलढाणा चे सचिव विजय पळसकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. सदर जिल्हा संघाला जिल्हा संघटनेचे मनीष लखानी, प्रा.कैलास पवार, डॉ.राजेश जयकर हनुमंत भोसले बंडू खराडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.