चिखली बु।। येथे राज्यभिषेक पुस्तकाचे वाटप

0
11

साईमत बोदवड प्रतिनिधी

तालुक्यातील चिखली बु।। येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक २०२३/२४वर्षे मराठा सेवा संघा तर्फे साजरा करण्यात येत असून या निमित्ताने चिखली बु येथे राज्यभिषेक पुस्तके वाटप करून वाचन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्यभिषेक सोहळा ६ जुन रोजी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला, तसा मराठा सेवा संघाने विविध कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण भारतभर साजरा केला. ६ जुन २०२३ ते ६ जुन २०२४ हे संपुर्ण वर्ष मराठा सेवा संघ “शिवराज्यभिषेक त्रि शतकोत्तर सुवर्तमहोत्सवी वर्ष” म्हणुन विविध कार्यक्रम , संस्था, शाळा विद्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था यांना सोबत घेऊन साजरे करणार आहेत, त्यातीलच एक भाग म्हणुन चिखली बु।। ता बोदवड येथिल विठ्ठल मंदिरात इ .५ वी ते ७.वी च्या विद्यार्थी यांची मा. इंजि .युगपुरुष पुरूषोत्तम खेडेकर लिखीत त्रि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शिवराज्याभिषेक महात्मा ह्या पुस्तकाची वाचन स्पर्धा व याच पुस्तकावर आधारीत निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व स्पर्धा परीक्षा क्रांती दिन ९ ऑगस्ट २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत या स्पर्धा होणार आहेत. प्रथम बक्षिस ५००/-, द्वितीय बक्षिस ३००/- व तृतिय बक्षिस २००/- असे असणार आहे. आता पर्यंत ७० विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदवलेली आहेत तरी सर्व ‌विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिवविनंती आहे आपल्या राजा साठी एक दिवस या नुसार स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे ,शिवकुमार कृणाल प्रविण पाटील व शिवकुमार आरव किशोर पाटील याच्या कडे किंवा मो नंबर ९९६०६०३१४१ यावर आपली नाव नोंदणी करायची आहे.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आनिल पाटील, तालुकाध्यक्ष विलास सटाले, संभाजी ब्रिगेडचे अंनता वाघ, निवृत्ती ढोले, आमोल पाटील, विशाल पाटील, जितेंद्र पाटील, गजानन पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here