साईमत भुसावळ प्रतिनिधी
येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय प्रसंग नमूद असलेल्या शिवराज्याभिषेकाचा पराक्रम या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून युवकांना देशाचे स्वातंत्र्य संस्कृती आणि संस्कार यांची जपणूक कशी व्हावी, कशी करावी, त्यांना तीमिरातून तेजाकडे जाण्याचा मार्ग मिळावा. खऱ्या अर्थाने भारत समृद्ध , संपन्न , आदर्श बलशाली सशक्त व्हावा व आजची युवा पिढी मार्फत उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविण्यात यांचा खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय प्रसंग नमूद असलेल्या शिवराज्याभिषेकाचा पराक्रम या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमास आदिवासी ठाकूर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मुन्ना ठाकूर, प्राध्यापक निलेश पाटील, प्राध्यापिका अस्मिता पाटील, विनीत हंबर्डीकर, वसुंधरा परिवाराचे चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेचे भुसावळचे जिल्हाप्रमुख रितेश जैन, साई निर्मल फाउंडेशन तथा श्री नरेंद्र मोदी विचार मंच अध्यक्ष शिशिर जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र बराटे, नितीन पांझोक, अभिषेक चतुर यांनी परिश्रम घेतले.