Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»आजच्या युवा पिढी साठी बहिणाबाई दीपस्तंभ – प्रा.साळवे
    मुक्ताईनगर

    आजच्या युवा पिढी साठी बहिणाबाई दीपस्तंभ – प्रा.साळवे

    SaimatBy SaimatAugust 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी

    बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून सुद्धा मराठी साहित्याच्या जगतात साहित्यसम्राज्ञी बनल्या. त्यामुळे आजच्या युवा पिढीसाठी बहिणाबाई दीपस्तंभ आहेत, त्यामुळे आजच्या युवकांनी कवी, लेखक व वक्ता बनून बहिणाबाईंचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले.

    श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र चौधरी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे उपस्थित होते.
    सर्वप्रथम मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य महाजन यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब, समाज व राष्ट्राची उन्नती साधावी असे आवाहन केले.

    कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे, प्रा. सौ. देशमुख, प्रा. सौ. खर्चे, प्रा. कोळी उपस्थित व गणेश शिमरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा.प्रतिभा ढाके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी, तर प्रास्ताविक प्रा.डॉ.ताहीर मीर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.