साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरमधील समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. चेन्नईमध्ये रायपेटा याठिकाणी जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.