साईमत, जामनेर l प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीच्या खून प्रकरणी नराधम आरोपीस आणि आरोपीला मदत करणाऱ्या सर्वांना कडक शासन होण्यासाठी जामनेर येथील तहसीलदारांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले. आरोपीस मृत्यूदंडसारखे शासन व्हावे जेणेकरून समाजात अशा प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावतीने नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांनी स्वीकारले.
आरोपीच्या कुटूंबातील सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांनी या गुन्ह्यात मदत केली असेल तर त्यांनाही कठोर शासन करावे, आरोपी हा गुंड प्रवृतीचा असून त्याची मागील पार्श्वभूमी तपासावी, अशा गुंड प्रवृत्तीपासून समाजाला अजून धोका पोहचू शकतो, म्हणून जामीन मिळू नये, हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी राहूल चव्हाण, अशोक पाटील, दिलीप खोडपे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.नंदलाल पाटील, माधव चव्हाण, अतुल सोनवणे, विश्वजित पाटील, नरेंद्र धुमाळ, सुनील कानडे, दशरथ पाटील, उमेश पाटील, नवल पाटील, सागर पाटील, शांताराम माळी, अशोक पवार, अजय मराठे, संदीप मराठे, भरत पवार, संदीप पाटील, प्रवीण गावंडे, संदीप मराठे यांच्यासह शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.