साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय येथे ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांनी ७५ दिवे लावून दिव्यांची रांगोळी साकारण्यात आली. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांच्यामार्फत विद्यार्थी व शिक्षकांनी पंच प्रण शपथ घेतली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक आनंद जगताप, नरेंद्र पवार, राकेश चित्ते, श्रीमती लता निकम आदींनी शहीद क्रांतीकारकांना अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी मनोगतात “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले.