सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवाडे ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावातील नवविवाहित दाम्पत्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. नवविवाहित जोडप्यांना दोन झाडे लावावी लागणार आहेत. त्यांचबरोबर लोकांना त्या झाडासोबत दोन फोटोही जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्रामपंचायत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करणार आहे. हा नियम ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
किंजवाडे गावाचे सरपंच संतोष किंजवाडेकर आणि ग्रामसेवक शिवराज राठोड हे आहेत. दोघांनीही गावा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्मार्ट गाव बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरावर गाव आणण्यासाठी गावात नवीन कल्पना राबवण्यात येत आहेत. याच आधारावर गावात नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, घराजवळ किंवा गावात कोणत्याही दोन प्रकारची झाडे लावण्यात यावी. त्याचबरोबर ज्यांच्याकडे जमिन जास्त आहे त्यांनी दोनपेक्षा अधिक झाडे लावावीत. एकदा का नवविवाहित जोडप्यांनी झाडे लावली की ग्रामपंचायत एका दिवसाच्या आत मॅरेज सर्टिफिकेट जोडप्याला देते.
खरे तर झाडे-झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र उपक्रम राबविला आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्या झाडांसोबत फोटो काढून उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शिवराज राठोड व ग्रामपंचायत यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे किंजवडे गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील रहिवाशांनीही ग्रामपंचायतीचा या निर्णयाचे कौतुक केले आहे. अनेकांनी असे फोटो ग्रामपंचायतींना पाठवले आहेत. तर, काही स्वतः पुढाकार घेऊन झाडे लावत आहेत. निसर्गाची होणारी हानी रोखण्यासाठी झाडे लावणे हे गरजेचे आहे.