रत्नागिरी जिल्ह्यातील निलिमा चव्हाणच्या हत्तेच्या निषेधार्थ बोदवड येथे नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0
31

साईमत बोदवड प्रतिनिधी

नाभिक कन्या निलिमा सुधाकर चव्हाण (ओमळी गाव,चिपळूण जि.रत्नागिरी )हिच्या हत्तेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार बोदवड यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी व निलिमा चव्हाण हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी बोदवड तालुकाध्यक्ष धनराज शेळके, संत सेना महाराज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डापसे, जिल्हा कर्मचारी कार्याध्यक्ष संजय वाघ, दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश सोनोने, विवेक वखरे, युवक अध्यक्ष सोपान महाले, योगेश वखरे, प्रमोद कुंवर, ममता प्रमोद कुंवर व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here