साईमत यावल प्रतिनिधी
येथील जे. टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.८ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी , सरस्वती विद्या मंदिर मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी उपस्थित होते.
तालुका विज्ञान अध्यक्ष तथा समन्वयक डॉ.नरेंद्र महाले, विषय तज्ञ संदीप मांडवकर, भूषण वाघुळदे , सह समन्वयक सचिन भंगाळे , जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल शाळेतील प्राचार्या रंजना महाजन, डॉ.किरण खेट्टे उपस्थित होते.
डॉ.नरेंद्र महाले बोलतांना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना सर्व समाजापर्यंत भरड धान्याची आवश्यक ती माहिती पोहोचवण्यास मदत या उपक्रमांमधून होईल.
गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना व शिक्षक यांना विज्ञान मेळाव्याबद्दल सविस्तर माहिती दिली. या मेळाव्यात वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार ‘भ्रम’ याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमासाठी किरण महाले, नितीन बारी, एच.ए.पाटील, के.जी. चौधरी , सुधीर पाटील यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून वैशाली इंगळे, सुनीता पाटील, दिपाली धांडे या शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांनी केले . श्रद्धा बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आभार राजश्री लोखंडे यांनी केले.