साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
येथील स्माईलिंग स्टोन फाउंडेशनतर्फे अल्फला उर्दू हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता पाचपांडे, पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण पाचपांडे यांची उपस्थिती होती.
पहिली ते आठवी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे पुस्तके सरकार कडून वाटप केली जातात. पण इयत्ता ९ नंतर मुलांना बाहेरून पुस्तके घेण्याची वेळ येते. या परिस्थितीत काही गरीब घरातील मुलांना ते परवडत नाही, म्हणून मुक्ताईनगर येथील अल्फला उर्दू शाळेतील शिक्षक काही दिवसआधी पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मुक्ताईनगरचे संचालक डॉ. प्रवीण पाचपांडे यांना भेटायला आले. शाळेची पुस्तके महाग असल्यकारणाने त्यांनी गरीब कुटुंबातील मुलींची यादी दिली व आपल्या स्माइलिंग स्टोन फाउंडेशन मधून मदत करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रस्तावावर फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता प्रवीण पाचपांडे व इतर सदस्यांशी चर्चा केली असता हा प्रस्ताव लगेच मंजूर करण्यात आला. आश्वासना प्रमाणे बुधवार दि.९ रोजी सकाळी ११ वाजता अल्फला उर्दू शाळेतील मुलींना फाउंडेशनतर्फे शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक इकबाल शाह, संस्था सचिव नूर मोहम्मद खान, रफिक खान, रहीम खान व अनस खान, सदस्य पंकज बोदडे , देवेंद्र ठोसर आदी होते.