साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्यासंदर्भात केलेले विधान असत्य आहे. पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहे, युती तोडण्याचा निर्णय भाजपने एकमुखाने घेतला होता. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. खरेतर त्यांनी ही घोषणा करायला हवी होती. मात्र, तेव्हा ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मी स्व:त उद्धव ठाकरेंना फोन करुन आपली युती आजपासून तुटली असे सांगितले होते.असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे पुढे म्हणाले की, २०१४ ला शिवसेनेने युती तोडली आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, हे संपूर्ण असत्य आहे. भाजप म्हणून प्रत्येकाने तो निर्णय एकमुखाने घेतला होता.
काय म्हणाले पंतप्रधान ?
महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपने नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीए खासदारांच्या बैठकीला मोदींनी मार्गदर्शन केले. याव्ोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही मोदींनी स्तुती केली. महाराष्ट्रात शिवसेना -भाजपसोबत सत्तेत होती, त्याव्ोळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक व्ोळा सहन केले. ठाकरेंना सत्तेत पण राहायचे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे, या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील?
संजय राऊतांचे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत युती त्यांनीच तोडली असल्याचा आरोप केला होता. यावर खासदार संजय राऊत यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. युती तोडल्याचा फोन खडसेंनी उद्धव ठाकरेंना केला होता. २०१४ मध्ये युती कोणी तोडली, हे मोदींनी तपासाव्ो असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला. युती तोडण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‘सामना’ या वृत्तपत्राची दखल घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.