साईमत, जळगाव, प्रतिनिधी,
– खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करताना अचानक तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. तोल जावून पडल्याने त्याला तातडीने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी 3 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शाहू नगरातील शेख वाहिद शेख रफिक (वय34) असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. शेख वाहिद शेख रफिक हा इमारतीच्या खिडक्या बसवणाऱ्या ठेकेदाराकडे पाच वर्षापासून कामाला होता. ठेकदाराचे सिंधी कॉलनीत एका बांधकाम केलेल्या इमारतीला खिडक्या बसविण्याचे काम घेतले होते. 3 ऑगस्ट रोजी या इमारतीला खिडकी बसविण्यासाठी शेख वाहिद हा देखील गेला होता.
त्यावेळी दुपारच्या सुमारास खिडकी बसवितांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. येथे काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जखमी अवस्थेत गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरूणाच्या पश्चात आई मुमताजबी, भाऊ इरशाद, पत्नी फरजाना आणि तेहरीन व आयात या दोन मुली असा परिवार आहे.
