‘चल जेजुरीला जाऊ ……‌’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून

0
12

साईमत, पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जेजुरी इथे ‌‘शासन आपल्या दारी‌’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतले.

राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे. राज्यात सर्व जाती-धर्मामध्ये सलोखा नांदू दे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करावी. तसंच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना खंडेरायाचरणी केली. खंडोबा चरणी तळी भरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देवाचं दर्शन घेतले. अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पारंपारिकरित्या डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी घेत गड उतरला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. याव्ोळी अजित पवारांनी सर्वांचं भलं व्हावे असे साकडं खंडेरायाला घातले. तसेच जय मल्हाराचे आशीर्वाद असेल तर सगळं चांगलं होतं असेही ते म्हणाले. याव्ोळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पेहेरावाची खास चर्चा होती.

घोंगडी, काठी आणि पगडी घालून सन्मान
जेजुरी गडावर मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घोंगडी, काठी आणि पारंपारिक पगडी घालून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here