मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील टोलचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत बनत चालला आहे. राज्यातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असातना टोल का भरावा असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उचलून धरला होता.आता, यावरूनच, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल सुरू का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस वे एमएमआरडीएने मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. या दोन्ही रस्त्यांचं अपकिप, डागडुजी, रंगरंगोटी, लाईट्सचे मेटन्टेनस मुंबई महापालिकेच्या खर्चातून होणार आहे किंवा होत असेल. मुंबईकरांच्या कराच्या पैशांतून या दोन प्रमुख रस्त्यांचं अपकिप होत असेल तर मग अजूनही तेथील टोलनाक्याचा पैसा एमएसआरडीसीसाठी का जातोय? तेथील होर्डिंगचे पैसे एमएसआरडीसीसाठी का जातायत?