साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहजीब नॅशनल उर्दु शाळेच्या विविध तक्रारींबाबत दैनिक ‘साईमत’मध्ये वृत्त झळकल्यानंतर पालकांसह शेख मुस्ताक यांनी तहजीब नॅशनल उर्दु शाळेचे संचालक, मुख्याध्यापक यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. शाळेचे सचिव तसेच काही संचालक, मुख्याध्यापक मनमानी करतात. सचिवांची बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी काही पालकांनी केली आहे.
तहजीब नॅशनल उर्दु शाळेचे शिक्षक शफी नामक हे व काही शिक्षक शाळेतील जास्त क्लास म्हणून घरी खासगी क्लास चालवितात. खासगी शिकवणीवर बंदी असून हे शिक्षक खासगी शिकवण्या घरी घेतात. त्यांना मुख्याध्यापकांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. दुपारून जी शाळा भरते ते शिक्षक विद्यार्थ्यांना न शिकविता तासन्तास मोबाईलवर बोलतांना व सोशल मीडिया खेळताना दिसतात. शाळेचे चेअरमन शब्बीर नाना व एक संचालक हुसनोद्दीन या शाळेत चांगली शिस्त लावतात. लक्षही ठेवतात. वेळोवेळी मुख्याध्यापक त्यांचे कान टोचत असतात. मात्र, शाळेत आठवी ते दहावी सायन्स वर्गाचे अडीच महिन्यापासून प्रॅक्टिकल होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत मुख्याध्यापक जवाबदार असतील असे पालकांनी संताप व्यक्त करत सांगितले. शाळेच्या आवारात अकरावी, बारावीचे हुल्लड मुले मजनुगिरी करतांना दिसतात, अशीही पालकांनी माहिती दिली. त्यावर संचालक मंडळासह मुख्याध्यापकांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.