साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि खा.उन्मेश पाटील यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळे चाळीसगावच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, ६ ऑगस्ट रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा १६२ वर्षानंतर कायापालट होऊन “अमृत भारत स्टेशन” योजनेमुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच चाळीसगाव स्टेशनला आधुनिकीकरणाचा साज चढणार आहे.
कार्यक्रमाला खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री एम.के. आण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, रेल्वे समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, योगाचार्य वसंतराव चंद्राते, रेल्वे अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह यांच्यासह सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, विविध आघाडी मोर्चाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकेश पवार तर सुनील निकम, शहराध्यक्ष घृषणेश्वर पाटील यांनी आभार मानले.